Wednesday, 1 March 2017

समाज प्रबोधन (डॉ. आ.ह. सर)

डॉ. आ.ह.साळूंखे

** सामाजिक चळवळ 2 पद्धतीने पुढे न्यावी...
1. ज्यांनी इतिहास चुकीचा लिहिला त्यांचे माप त्यांच्याच पदरात घालणे योग्य... पण 365 दिवस तेच करणे योग्य नाही.
2 तपासल्याशिवाय काही घ्यायचं नाही असं बुद्धांनी सांगितले आहे.तेव्हा प्रबोधनाचा प्रवास डोक्यापासून ह्रदयाकडे नव्हे तर ह्रदयाकडून डोक्याकडे झाला पाहिजे.

** बुद्धांनी ज्यासाठी हयात झिजवली  त्याच साठी आजही भांडतोय आपण.समता स्वातंत्र्य आणि बंधुता याबाबत आजही परिस्थिति जैसे थेच आहे.

**व्यूह रचना अशी करा की, जनसामान्यांच्या मनामध्ये जागा निर्माण झाली पाहिजे.
समाजात 10 ℅ शोषक 90 ℅ शोषित आहेत.
त्यातले 89 ℅ देवांवर श्रद्धा ठेवणारे आहेत.
जर तुम्ही कपाळावर मी ईश्वर मानत नाही अस लिहून प्रबोधन करायला गेलात तर त्यांच्या घराचेच नव्हे तर मनाचे ही दरवाजे आपल्याला बंद होतात.

**चळवळी का फसतात ? एक महत्वाचे कारण, थेट हल्ल्यामुळे.
समजा एखादा वर्षात 6 सत्यनारायण घालतो. तुमच्या प्रबोधनाने त्याने प्रमाण कमी केले व तो आता 2 सत्यनारायण घालतो. तर ते चळवळीचे यश माना. बदल एका रात्रीत होत नाहीत.

**बाहेरून लादलेलं गोंदण हे बाहेरच असलं तरी खरवडून काढताना यातना होणारच, पण जर ते काम कुशलतेने केले तर त्याची होणाऱ्या त्रासाला दोन हात करण्याची मानसिकता तयार होते.

** मुकाट नसावे तसेच मोकाट ही नसावे.

** प्रश्न विचारणारांवर हल्ले करु नयेत. त्यांचे समाधान होईपर्यन्त शांतपणे उत्तरे द्यावित.

** जिभेच्या खेळाने संस्कृती उभी राहत नाही.

** टोकदार' निरिश्वरवाद नको......
"जो व्यक्ती स्वत:  ईश्वराचं अस्तित्व मानत नसेल, पण ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्‍या परंतु  शोषण, विषमता वगैरेँना बळी पडलेल्या लोकांमध्ये वावरताना आपल्या  निरिश्वरवाद 'टोकदार' बनवून, त्याच्या पात्याला धार लावून, तो समाजात  परिवर्तन घडवू शकणार नाही. आपल्या कपाळावर ठसठशीतपणानं निरिश्वरवादाचा फलक  लावून, तो लोकांमध्ये वावरु लागला, तर ज्यांच्यामध्ये परिवर्तन करायचं,  त्यांच्या घरांचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद होतील, मग मनाचे व बुद्धीचे  दरवाजे उघडणं तर फार दूरची गोष्ट झाली. म्हणुनच त्यानं स्वत:चा निरिश्वरवाद  वा टोकाची तत्सम इतर मतं काही अपवादात्मक प्रसंग वगळता स्वत:च्या  उंबरठ्याच्या आत ठेवुन परिवर्तनाच्या क्षेत्रात उतरायला हवं.
हा  दुटप्पीपणा नव्हे, की डावपेच नव्हे. ही तडजोड नव्हे, कि फसवणुक नव्हे. हा  जिव्हाळा आहे, ही आत्मीयता आहे आणि या जिव्हाळ्याचं, या आत्मीयतेचं  सर्वोच्य शिखर आहे करुणा !"

✒... *मन निरभ्र व्हावं* या पुस्तकातून

No comments:

Post a Comment