मराठा म्हणजे काय ?
शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील नोंद..?
कि राष्ट्रगीतामध्ये वर्णन केलेला एक प्रदेश?
कि समाजात वर्षानुवर्षे वावरणारा एक समुह???
काहींना वाटेल मराठा म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांशी लढून
त्यांना संपवणारा वर्ग...
तर काही म्हणतील...
नाही ..
मराठा म्हणजे बहुजनांवर अत्याचार करणारा वर्ग म्हणजे मराठा .............
पण हे सारं सारं अपुरं आणि असत्य आहे...
आमची ओळख करुन
देण्यासाठी ...
भल्या पहाटे उठावं आणि स्नानकर्म करून
शिळ्या भाकरीलाही मिटक्या मारत संपवून दिमाखात घर
सोडणारे आम्ही ...
आळस आमचा दुश्मण...
कष्टाची लाज नाही..
आणी थकून जाण्याची सवय नाही...
प्रसंगी स्वतः अपेष्टा सहन करू.. पण मदत मागून तर
बघा...
आम्ही उपाशी असु पण आमची माणसं
जगवण्याची धडपड करतो आम्ही ...
मराठा म्हणजे
मनाचा मोठेपणा..
मराठा म्हणजे त्याग...
मराठा म्हणजे
कुणासाठी सर्वस्व देणे...
मराठा म्हणजे अथक संघर्ष ...
मराठा म्हणजे जीथे
लाचारीला थारा नाही...
मराठा म्हणजे संस्कार ...
मराठा म्हणजे संस्कृती ...
पानिपताच्या रणसंग्रामात आमची उपाशी फौज
शाडूची माती खाऊन जगली...
मात्र सोबत हजारांवर जनावरे असतांना त्यांना आपल्या पोटासाठी कुणी कापले नाही....
मराठा म्हणजे मरा तभि हठा तो मर्हाटा...
हे आमचं नाव आमच्या शत्रू ने दिलं...
शेती ,पशुपालन, शिक्षण,
क्रिडा, साहित्य, प्रशासन, राजकारण करता करता आम्ही साम,
दाम, दंड, भेद, आणि पराक्रम यांची निवड प्रसंग पाहुन करतो...
आमची संस्कृती आम्हाला सोडायची नाही.. आणि प्रगतीच्या शिखराला पादाक्रांत
केल्याशिवाय थांबायचं नाही...
ही प्रतिज्ञा म्हणजे मराठा..
.जय जिजाऊ जय शिवराय.
🚩जयस्तो मराठा🚩
No comments:
Post a Comment